सुट्ट्यांच्या काळ सुरू होतोय. अवघ्या दीड महिन्यात 2018 सुरू होईल. मग नववर्षाचं सेलिब्रेशन आणि तुमचा सुट्ट्यांच्या प्लॅन बनवत असाल तर 'गो एअर' ची खास ऑफर तुमच्यासाठी आहे.गो एअर' ने शुक्रवारी थोड्या अवधीसाठी एक खास ऑफर घोषित केली आहे. यानुसार अवघ्या 312 रूपयांमध्ये विमानाचा वन वे प्रवास करणं शक्य होणार आहे. दिल्ली, कोची, बंगळूरू,हैदराबाद,चैन्नई, अहमदाबाद, लखनऊ अशा सात शहरांसाठी उपलब्ध आहे. मात्र या ऑफरमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रथम येणार्यास प्राधान्य यानुसार प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहेत. गो एअरची ही ऑफर 1 डिसेंबर ते 28 ऑक्टोबर 2018 या दरम्यान उपलब्ध होणार आहे. तर या तिकिटांची बुकिंग 29 नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews