देशातील आठ मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात..राजकीय वातावरण तापले.
देशातील ८ मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये बिहार राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासह जीतनराम आणि जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. यासोबतच देशातील
8 व्हीव्हीआयपी नेत्यांचा देखील समावेश आहे.
लालू प्रसाद यादव आणि जीतनराम मांझी यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा होती. आता दोघांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय एनएसजी कमांडो देखील लालूंच्या सुरक्षा रक्षकांमधून कमी करण्यात आले आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाने याशिवाय गुजरातचे राज्यमत्री हरिभाई चौधरी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश टी एस ठाकूर, जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी, दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांची सुरक्षा कमी केली आहे. जुलै महिन्यात लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना पटना विमानतळावर मिळणारी विशेष सुविधा देखील केंद्र सरकारने बंद केली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews