प्रकाश हिमाचल प्रदेश च्या राजधानी हून दिल्लीला जाण्यासाठी प्रवास करत होते. बस मध्ये त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी त्यांच्या मोज्यांमधून येणाऱ्या दुर्गंधी ची तक्रार केली. आणि त्यांना मोजे काढून बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले. परंतु प्रकाश यांनी मोजे काढून ठेवण्यास नकार दिला. आणि त्यांचा प्रवाश्यांसोबत वाद होण्यास सुरवात झाली. बस दिल्ली पर्यंत पोहोचण्याच्या आधीच प्रवाश्यांनी चालकाला बस थांवायला सांगितली आणि प्रकाश ह्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. त्यावर प्रकाश ह्यांचे म्हणणे आहे कि माझ्या मोज्यांमधून अजिबात दुर्गंध येत नव्हता. तरी त्यांच्या सोबत प्रवास करणारे उगाचच माझ्याशी भांडत होते. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून प्रकाश ला जामीन दिला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews