काँग्रेस कार्यालयावर हल्ल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'बांगड्या' दाखवून मनसेचाप्रतिकात्मक निषेध केला होता. परंतु, अशाप्रकारे बांगड्या दाखवणे, हा महिलांचा अपमान नव्हे का? काँग्रेस पक्षाच्या मुल्यांचा आणि विचारसरणीचा अपमान नव्हे का?, असा सवालही नितेश यांनी विचारला.मनसेकडून काँग्रेस पक्षाच्याकार्यालयावर हल्ला चढवण्यातआल्यानंतर संजय निरूपम आणिपक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा आम्ही करारा जवाब देऊ, असा इशारा देण्यात आला होता. यावरून काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी स्वपक्षीयांनाच खडे बोल सुनावले आहेत. मनसेने काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली ते कृत्य चुकीचेच होते. मात्र, महात्मा गांधीजींचे अनुयायी असलेले मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते प्रतिहल्ला करण्याच्या धमक्या केव्हापासून द्यायला लागले, असा बोचरा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews