अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी साकारलेल्या या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. ‘शोले’ या चित्रपटा तील जय- विरुची जोडी सुपरहिट ठरली. या चित्रपटावरून नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी बिग बींवर निशाणा साधला. ”शोले’तील भुमिकेसाठी अमिताभ यांची शिफारस मीच केली होती. याचं श्रेय ते आता मला देत आहेत. आज ते यशाच्या शिखरावर आहेत, त्यामुळे लोक फक्त त्यांच्या महानतेबद्दलच बोलतील. मी शिफारस केल्याचं त्यांनी यापूर्वी कधीच म्हटलं नव्हतं. इतकं यश संपादन केल्यानंतर त्याचं श्रेय ते मला देऊ लागले आहेत तर लोक त्यांनाच महान समजतील, मला नाही,’ असे धर्मेंद्र म्हणाले.धर्मेंद्र यांची ही मुलाखत इतरही बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिली. यामध्ये त्यांनी बॉलिवूडच्या सध्याच्या परिस्थितीवरही टीप्पणी केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews