हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानात अटक करण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची अनुमती देण्यात आली आहे. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात जाऊ कुलभूषण यांची भेट घेऊ शकणार आहेत. येत्या 25 डिसेंबरला आई आणि पत्नी पाकिस्तानात कुलभूषण यांची भेट घेणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, कुलभूषण यांच्या आई व पत्नीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिलमध्ये कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली असून, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
जाधव यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान सरकारला विनंती केली होती. त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची अनुमती दिल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी सांगितले. मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तापत्रात फैजल यांनी ही माहिती दिली. तसेच जाधव यांच्या कुटुंबियांसमवेत भारतीय दुतावासाचा एक सदस्य असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews