तुर्कीमधील सर्वात मोठ्या सरोवराखाली एक ऐतिहासिक किल्ला सापडला आहे. हा किल्ला तब्बल ३ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे शोधकर्त्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. शोधमोहीमेत सापडलेला किल्ला अद्यापही चांगल्या स्थितीत असल्याने पुरातन काळात मानवी संस्कृती आणि इतिहासा बाबत रहस्यमय खुलासे होण्याची शक्यता आहे.शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात राहणाऱ्या नागरिकांनी अनेक वेळा सरोवराखाली काहीतरी ऐतिहासिक रहस्य दडल्याची माहिती दिली होती. मात्र पुरातत्व विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा ऐतिहासिक किल्ला जगासमोर येण्यासाठी इतकी वर्ष लागले. सरोवरामध्ये मागील १० वर्षांपासून संशोधन सुरू होते. या दरम्यान किल्ल्याबाबत अधिक माहिती उजेडात येत गेल्याचे शास्त्रज्ञ म्हणाले. सरोवरा मध्ये सापडलेला किल्ला तब्बल ३ हजार वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता आहे. हा किल्ला एक किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या भिंतींची उंची तब्बल 3 ते 4 मीटर आहे. विशेष म्हणजे सरोवराच्या खाऱ्या पाण्या तही हा किल्ला उत्तम स्थितीत आहे.या किल्ल्याचा बराचसा भाग दगडांपासून बनला आहे. शास्त्रज्ञांच्या मते उरारतु सभ्यतेचा हा एक भाग असण्याची शक्यता आहे. त्यावेळी वान घराण्याचे साम्राज्य होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews