अनुष्का शर्मा इटलीला रवाना, विरानुष्काच्या लग्नाच्या चर्चांना उधाण | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 13

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता
अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचं लग्न होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई विमानतळावर फक्त अनुष्का आणि तिचे कुटुंबीयच दिसले. परंतु विराट त्यांच्यासोबत नव्हता.
इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल.13 डिसेंबरला संगीत,14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, लग्नासाठी अनुष्का आणि विराट थेट इटलीला जाणार नाही. अनुष्काने शुक्रवारी रात्री मुंबईहून दुबईला उड्डाण केलं आहे. दुबईमध्ये लग्नाची खरेदी केल्यानंतर पुढील टप्पा सिंगापूर असेल. सिंगापूर मध्ये एक दिवस थांबल्या नंतर दोघे लंडनला जाणार आहे. तिथून 12 डिसेंबरला ते इटलीला पोहोचतील. दुसरीकडे 'विरानुष्का' इटलीमध्ये नाही, तर भारतात, तेही मुंबईतच विवाहबंधनात अडकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात जाऊन अनुष्काने स्वतः लग्नाच्या नोंदणीसाठी लागणारा फॉर्म आणल्याची माहिती आहे.त्यामुळे विराट-अनुष्काचं विवाहस्थळ आणि तारीख याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS