पत्नीचा मृतदेह 10 किमी अंतर खांद्यावर घेऊन जाणाऱ्या दाना मांझी आपल्याला माहीत आहेत. या घटनेनंतर अनेकांना चांगलाच धक्का बसला होता.मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. फोटोमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जातांना दिसत होता. गरिबी मुळे या व्यक्तीकडे पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी देखील पैसे नव्हते. ओडिशा मधील अतिशय अविकसित भागात राहणारे कालाहांडी जिल्ह्या तील दाना मांझी यांच्या पत्नीचा टीबीमुळे मृत्यू झाला होता. त्यांच्याकडे अॅम्ब्युलन्स साठी देखील पैसे नव्हते. पण आज या व्यक्तीचं आयुष्य संपूर्ण बदललं आहे.मांझी यांच्या मुलीला आज ओडिशा सरकार भुवनेश्वरमध्ये शिकवत आहे. मांझी यांचा तिसरा विवाह झाला आहे. आता ते नव्या बाईकवर फिरत आहेत. त्यांच्या बँकेमध्ये 36 लाख रुपये जमा आहेत.
मंगळवारी दाना मांझी यांनी कालाहांडी जिल्ह्यातील भवानीपाटा येथील एका बाईक शो-रूममधून नवीन बाईक खरेदी केली होती. त्य़ांना बाईक चालवता नाही येत म्हणून सोबत ते भाच्या ला घेऊन आले होते.
ओडिशा सरकारकडून इंदिरा आवास योजनेअंतर्गत त्यांना घर देखील मिळालं आहे. बेहरीनचे पंतप्रधान प्रिंस खलिफा बिन सलमान अल खलिफा यांनी त्यांना 9 लाखांची मदत केली. याशिवाय अनेक लोकांनी त्यांना मदत केली. ज्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आता 36 लाख रुपये जमा झाले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews