आपल्या अवैध संबंधांसाठी पत्नीने आपल्या पतीचा खून केला असे आपण अनेकदा वाचले आणि ऐकले असेल. पण त्याही पुढे जावून प्रियकराला आपला पती सिद्ध करण्यासाठी ह्या स्त्रीने सगळ्या हद्द पार केल्या आहेत. पत्नीने प्रियकराच्या मदतीने आधी पतीचा खून केला मग प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून हाच आपला पती आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला. हैद्राबादमध्ये राहणाऱ्या एम.स्वातीने तिचा
प्रियकर राजेश च्या मदतीने पती एम. सुधाकर रेड्डी याची हत्या केली त्याची ओळख लपवण्यासाठी प्रियकरावर अॅसिड फेकले. कुटुंबीयांनी सुद्धा राजेश ला सुधाकर समजून रुग्णालयात दाखल केले. कुटुंबातील एकाने उपचार घेणाऱ्या राजेशला मटन सूप दिले परंतु राजेश शाकाहारी असल्याने सूप पिण्यास नकार परंतु सुधाकरला मटन सूप खूप आवडत असल्याने त्यांच्या मनात शंका आली.पोलिसांनी बोटाचे ठसे घेताच संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews