या' सहा वर्षाच्या मुलाची कमाई एेकून चकीत व्हाल!वय लहान पण कीर्ती महान | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

वय वर्ष सहा म्हणजे खेळायचे-बागडायचे वय. मात्र याच वयात एक मुलगा कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकतो. ऐकून थोडे आश्चर्य वाटले असले पण हे अगदी खरे आहे.काही दिवसांपुर्वी फोर्ब्सने यू-ट्यूबच्या माध्यमातून कमवणाऱ्यांची टॉप 10 लोकांची यादी जाहीर केली. 6 वर्षां चा रायन यात 9 व्या स्थानावर आहे. या मुलाने यू-ट्यूबच्या माध्यमातून वर्षभरात 11 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 71 कोटी रूपये कमावले आहेत. यानुसार हा मुलगा एका महिन्यात सुमारे 6 कोटी रुपये कमावतो. या मुलाचे नाव रायन टॉयज रिव्यू असे असून त्याचे यू-ट्यूब चॅनल अत्यंत लोकप्रिय आहे. कोट्यवधी लोकं त्याचे चॅनल पाहतात. रायन आणि त्याच्या कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या या चॅनलमध्ये खेळण्यांचा रिव्यू केला जातो. आतापर्यंत खूप व्हिडिओज चॅनलवर अपलोड केले आहेत. जायंट एग सरप्राईज' या चॅनलला 80 कोटींहून अधिक व्यूज आले आहेत. त्याचबरोबर 10 मिलियन म्हणजे 1 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. 
रिपोर्ट नुसार, प्रत्येक महिन्यात रायन एका जाहीरातीतून एक मिलियन डॉलर कमावतो. त्यावर टॅक्स भरून त्याची कमाई एकूण 14.5  बिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे सुमारे 93 कोटी रूपये आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS