लातूरच्या निलंगा तालुक्यामधल्या लिंबाळा गावातल्या रमेश नाईकवाडेंनी आपल्या गुलाबो नावाच्या गायीचा थाटामाटात वाढदिवस साजरा केला. वाढदिवसा साठी त्यांनी पत्रिकाही छापल्या होत्या. गावात, निलंगा तालुक्यात तसंच लातूर जिल्ह्यातही प्रतिष्ठितांना वाढदिवसाचं निमंत्रण पाठवलं. खास शामियानाही थाटला होता. यावेळी गाईची विधिवत पूजा करण्यात आली आणि केकही कापण्यात आला. वाढदिवस पार पडल्यानंतर निमंत्रितां साठी बोरसुरीच्या डाळीचं वरण आणि भाकरी चा चमचमीत बेतही आखला होता.यावेळी उपस्थितही या कार्यक्रमानं भारावून गेले होते. माणूस माणसाचा वैरी झाल्याचं आपण अनेक ठिकाणी पाहतो. मात्र रमेश नाईकवाडे या शेतक-यां सारखे अनेक लोकं आजही आहेत जे आपल्या मुक्या जनावरांवर निस्सीम प्रेम करतात. त्यामुळे अशा अनोख्या वाढदिवसाची चर्चा तर होणारंच.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews