दिल्ली पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली क्रिकेट खेळाडू ‘धोनी’ला अटक केली आहे. ‘धोनी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटर विजय कुमारला पोलिसांनी रविवारी द्वारकामधून अटक केली. विजयवर दिल्ली कँट येथे 2016 मध्ये झालेल्या हत्येचा आरोप आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमारने २०११ पर्यंत जिल्हा स्तरावर क्रिकेट स्पर्धा खेळल्या आहेत. हिंदुस्थानी संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनीच्या खेळापासून प्रेरित होत विजयने त्याच्यासारखे लांब केसही ठेवले होते. त्याचमुळे क्रिकेट वर्तुळात त्याला धोनीच्या नावाने ओळखले जात होते. मात्र दिल्ली संघामध्ये निवड न झाल्याने विजय गँगस्टर गौरव झरेडाच्या गँगमध्ये गेला होता. झरेडा गँगच्या अनेक गुन्ह्यांमध्ये विजयचा सहभाग आहे.विजय आणि विशाल या भावांनी आपल्या साथिदारां सोबत मिळून 17 जुलै 2016 ला डोक्यात लोखंडी रॉड आणि क्रिकेटची बॅट घालून एकाची हत्या केली होती असे पोलिसांनी सांगितले. दोघेही गेल्या एक वर्षापासून फरार होते आणि सतत लपण्याचे ठिकाण बदलत होते. मात्र पोलिसानी रविवारी द्वारका येथून विजय आणि त्याचा मोठा भाऊ विशाल यांना अटक केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews