गृहपाठ न केल्या मुळे कोल्हापूरातल्या चंदगड तालुक्यात ल्या कनूर चा भावेश्वरी विद्यालयात आठवीत शिकणारी विजया चौघुले ह्या मुलीस शिक्षकांनी 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ह्या शिक्षे मुळे ती मुलगी अत्यवस्थ आहे. विजया ला कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याच शाळेत शिपाई म्हणून काम करणारे तिचे वडील आधी शांत बसले पण जशी जशी विजया ची अवस्था बिघडली तशी तिचा वडिलांनी शाळे विरुद्ध तक्रार केली. ह्याचा मुळे विजयला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा त्रास सहन करावा लागला व ह्या सगळ्याला शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार आहेत असे विजयाचा वडीलानी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews