Latest Health News Update | आता खिसेकापू डॉक्टरांवर सरकार ची करडी नजर | प्रॅक्टिस करता येणार नाही

Lokmat 2021-09-13

Views 0

आजकाल रुग्णसेवा म्हणजे एक धंदा झाला आहे. आणि ह्यावर सरकार ने आपली वक्र दृष्टी टाकली आहे. मार्च 2018 मध्ये विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कट प्रॅक्टिसवर बंदी आणणारं विधेयक मांडण्यात येणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर सर्रासपणे रुग्णांची पिळवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील डॉक्टरां सोबतच आता सरकारी डॉक्टरही लुटारु झाले आहेत. कट प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर विशिष्ट डॉक्टर किंवा औषधांचा आग्रह धरतो. त्यामुळे संबंधित डॉक्टरला संबंधित व्यक्तीकडून मोठा मोबदला मिळतो.कट प्रॅक्टिसला वेसण घालण्याच्या कायद्याला मंजुरी मिळाल्यास यासंबंधी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरेल.हा गुन्हा सिद्ध झाल्यास पहिल्यांदा 1 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, आणि दुसऱ्यादा पकडला गेल्यास 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS