आजकाल फक्त भोंदू बाबा आपल्याला सगळी कडे पकडले जाताना दिसत आहेत.ह्यात हिंगोली जिल्ह्यातील खरवडमध्ये भैरवनाथ मंदिरातील पुजारी मुरलीधर महाराज यांनी जिवंत अग्निसमाधी घेतल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी मुरलीधर महाराज यांनी अग्निसमाधी घेत जीवनयात्रा संपवली. महाराजांच्या समाधीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कळमनूरी तालुक्या तील खरवड येथे भैरवनाथ मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिरात मुरलीधर महाराज हे पुजारी म्हणून काम करत होते आणि मंदिराशेजारीच दोन खोल्यांच्या घरात त्यांचे वास्तव्य होते. बुधवारी सकाळी ११ वाजता मुरलीधर महाराज यांनी अंगाला कपडे गुंडाळुन पेटवुन घेत अग्निसमाधी घेतली. सुमारे पाच वर्ष चिंचोली महादेव मंदिर येथे पुजारी म्हणून धार्मिक कार्य केल्यावर मागील पाच वर्षांपासून ते भैरवनाथ मंदिर येथे वास्तव्यास होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews