पुणे तिथे काय उणे’ ही म्हण तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकली असेल. पुण्यातल्या माणसांचं आणि शहराचं कौतुक करताना अनेकदा ही म्हण वापरली जाते. याच म्हणीचा प्रत्यय सध्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी पेंढार या डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाला येतोय, कारण या गावात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीप्रमाणे हुबेहूब दिसणारा एक तरुण राहतो. सिद्धेश संजय जाधव अस या तरुणाच नाव असून तो शेती आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतोय, याचसोबत त्याला क्रिकेटची देखील आवड आहे. हुबेहूब विराट सारखा दिसणाऱ्या सिद्धेशच्या अवतीभोवती पिंपरी पेंढार गावात अनेकदा त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी असते. भूषण यांनी सिद्धेश सोबतचे काही फोटो विराट कोहलीला दाखवले. विराटने भूषण यांना सिद्धेशला एकदा मुंबईत घेऊन येण्याची विनंती केली. सिद्धेशने तडक मुंबई गाठत, विराट कोहलीची भेट घेतली. या भेटीत विराटने सिद्धेशला क्रिकेटच्या सामन्यातं तिकीटही दिलं. उदर निर्वाहा साठी सिद्धेश आपल्या दोन एकर जमीनीत शेती आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो. खऱ्याखुऱ्या विराटचं उत्पन्न हे करोडो रुपयांत असलं तरी हुबेहूब दिसणाऱ्या विराटच उत्पन्न हे वार्षिक चार लाख एवढं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews