अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा अमेरिकेतील नागरिकांमध्ये सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती आहेत. तर माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या देशातील सर्वात आवडत्या महिला आहेत. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सलग १०व्यांदा ओबामा यांची पहिल्या स्थानावर वर्णी लागली असून क्लिंटन यांना १६ व्यांदा हा मान मिळाला आहे.१७ टक्के अमेरिकन लोकांना ओबामा जास्त आवडतात. तर आताचे राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असून पोप फ्रान्सिस तिसऱ्या स्थानावर आहेत. महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा आहेत.ओबामा हे अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांना जास्त पसंती मिळत असल्याचे दिसते. याशिवाय सत्तेत असतानाही आणि त्यानंतरही त्यांचे येथील जनतेशी असणारे वागणे-बोलणे, त्यांचा साधेपणा आणि त्यांची बुद्धीमत्ता तसेच विकास करण्याची त्यांची दृष्टी यांमुळे नागरिकांची त्यांना पसंती मिळत आहे. मागील वर्षी झालेल्या निवडणूकीमध्ये हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सामना करताना हार पत्करावी लागली होती. मात्र या स्पर्धेत हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांना मागे टाकल्याचे दिसत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews