धीरुभाई अंबानी यांनी कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना शून्यातून आपल्या उद्योगाची सुरुवात केली.१९६६ मध्ये धीरु भाईंनी रीलायन्स इंडस्ट्रीज ची स्थापना केली. त्यांचे व्यक्तिमत्व हे कायमच तरुणांना प्रेरणा देणारे ठरले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यानंतर रिलायन्सचा कारभार मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी सांभाळत आहेत. व्यापार-उद्योगासाठीचे त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना २०१६ मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण या नागरी क्षेत्रातील दुस-या क्रमाकांच्या पुरस्काराने सन्मानित केले. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगत असताना त्यांना वडिलां कडून मिळालेला सक्सेस मंत्र सांगितला. समस्या निर्माण झाल्यानंतर ती सोडवण्या पेक्षा ती निर्माण कशी होणार नाही हे शोधणे आवश्यक आहे. तसेच समस्येच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. कोणतेही काम सुरु करण्या आधी आपले लक्ष्य निश्चित करायला हवे. अन्यथा हाती काही लागत नाही.आयुष्यात आणि व्यवसायात प्रत्येकाला कधी ना कधी यश आणि अपयश येतेच. पण अपयशा ने खचून न जाता परिस्थिती चा सामना करणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टीकोन खूप महत्त्वाचा असतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews