कागाळी खोर पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा शिवसेनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. पाकिस्तान चा झेंडा जाळून यावेळी तीव्र निदर्शने करण्यात आली. कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी पाकिस्तानमध्ये त्यांना भेटायला गेल्यावर त्यांच्या कपाळावरील कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या उतरवायला लावल्या. बूट काढायला लावून परत केलेच नाहीत. तसेच भेटीदरम्यान मातृभाषेत बोलू दिले नाही. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews