Kulbhushan Jadhav |.. आणि पाकिस्तान ने चोरल्या चपला | International News | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 1

कुलभूषण जाधव याची भेट घेण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेल्या आई आणि पत्नीला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक चर्चेचा विषय ठरलीय. 
पाकिस्तानवर यासाठी जोरदार टीका होतेय. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ही यावर आक्षेप घेत सुरक्षेच्या आडून जाधव कुटुंबीयांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांचा अनादर करण्यात आल्याचं म्हटलंय. सोबतच, जाधव यांच्या पत्नीच्या चप्पलाही परत देण्यात आल्या नाहीत, असा दावाही भारतानं केला. 
भारताचा हा दावा पाकिस्तान ने मान्य केला पण, सोबतच जाधव यांच्या पत्नीच्या चप्पलांमध्ये 'काहितरी' होतं, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्या काढून घेण्यात आल्या.त्या चप्पला पडताळणीसाठी पाठवण्यात आल्यात. परंतु, यावेळी जाधव यांच्या पत्नीला दुसऱ्या चप्पला देण्यात आल्याचंही पाकिस्ताननं म्हटलंय. पण, यामुळे भारतीय मात्र नाराज दिसले. ट्विटरवर त्यांनी 'चप्पल चोर पाकिस्तान' हॅशटॅगसोबत ट्विट करत आपला राग जाहीर केलाय.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS