लेवदोराच्या एका मुस्लिम कुटुंबानं आपल्या शेजारी राहणाऱ्या चार अनाथ हिंदू मुलांचं पालकत्व स्विकारलंय. या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय मुस्लिम कुटुंबानं घेतलाय.
संबंधित मुलांची ४० वर्षीय आई बेबी कौल यांचं शनिवारी निधन झालं होतं. जवळपास वर्षभरापूर्वी या मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्रही हरवलं होतं. कौल यांच्या निधना नंतर त्यांची १५ आणि १६ वर्षांच्या मुलीसोबत १५ आणि ७ वर्षांचा मुलगा अनाथ झालेत. या मुलांकडे राहण्यासाठी घराशिवाय आणखी काहीही उरलेलं नाही. बेबी कौल यांना आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी सरकारनं एका बँकेत नोकरी दिली होती. परंतु, नोकरी मिळाल्यानंतर केवळ तीन महिन्यांत कौल यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा वेळी मुस्लिम बहुल गावानंच या मुलांची जबाबदारीस्वीकारलीय. गावानं चार क्विंटल तांदूळ, मुलांच्या शिक्षणाचा आणि इतर खर्चासाठी काही रक्कमही वर्गणीतून जमा केलीय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews