आसामच्या माजुली इथं गडकरी यांची एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. इथं त्यांनी जवळपास एक तास भाषणही केलं. भाषणानंतर ते खुर्चीवर बसले आणि त्यांनी डोकं खुर्चीवर टेकवलं. सभा सुरू असताना गडकरींची तब्येत ढासळली. त्यांनी अत्यवस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तात्काळ डॉक्टरांची टीम बोलावण्यात आली. कार्यक्रम स्थळी आलेल्या डॉक्टरांनी गडकरींच्या शरीरातील शर्करा आणि रक्तदाबाचं प्रमाण तपासलं. त्यानंतर त्यांनी गडगरींना एक केळंही खाण्यासाठी दिलं. आवाजाचं त्रास होऊ नये म्हणजे लगेचच स्पीकर्सचा आवाज कमी करण्यात आला. एवढ्या थंडीतही गडकरींच्या बाजुला एक पंखा लावण्यात आला. गडकरींचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना अस्वस्थ पणा जाणवू लागला, पण सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. जलमार्गाला प्रोत्साहन देण्यासाठी गडकरींनी शुक्रवारी ब्रह्मपुत्राशी लागूनच असलेल्या पांडु-ढुबरी मार्गावर मालवाहक पोतला हिरवा झेंडा दाखवला. या भागात नदीवर पाच पूल बनवणार असल्याची घोषणाही यावेळी गडकरींनी केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews