भारतात ई-वेस्टचे प्रमाण वाढत चालले आहे आणि त्याचे रिसायकलिंग करण्याबाबत जागरूकता वाढत चालली आहे. देशात वेगाने वाढणाऱ्या ‘वेस्ट ट्रिटमेंट’ एजन्सीमुळे कचरा व्यवस्थापन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी वाढत चालल्या आहेत. पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी यावर पुनर्प्रक्रिया करून खराब झालेली किंवा फेकून दिलेली वस्तू पुन्हा उपयोगात आणली जाते.निरोपयोगी, बेकार वस्तूंना पुन्हा नव्याने रूप देण्याच्या प्रक्रियेला वेस्ट मॅनेजमेंट असे म्हटले जाते. वेस्ट मॅनेजमेंट पर्यावरण प्रबंधक आणि संरक्षणाचा एक आधारस्तंभ मानला जातो. त्यानुसार पर्यावरण विज्ञान किंवा पर्यावरण संरक्षणाशी संबंधित काही प्रमुख क्षेत्रात काम करता येऊ शकते. कचरा व्यवस्थापन केवळ वापरात नसलेल्या वस्तूंचा पुन्हा उपयोग कसा करावा याची माहिती देत नाही तर व्यावसायिक पातळीवर स्थिरस्थावर होण्यासाठी अनेक प्रकारचे कौशल्यही शिकवले जाते. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पर्यावरणाबाबत आस्था असणे खूपच गरजेचे आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews