बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक करण जोहरमध्ये असणारे मतभेद आता उघड झाले आहेत. एवढेच नाही तर करणने याबद्दल टि्वटरवरून माफीही सुद्धा मागितली आहे. पण बिग अजूनही नाराज असल्याचे समोर येत आहे. करणने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये असलेला उत्तर भारतीय आणि पंजाबी संस्कृतीचा पगडा पाहून काही अंदाज बांधले होते. सुरुवातीला मला असं वाटायचं सिनेसृष्टीत सगळेच पंजाबी आहेत. माझे बाबा सगळ्यांशी पंजाबीत बोलायचे असं करणने म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर अमिताभही पंजाबी नसताना ते पंजाबी अत्यंत उत्तम बोलतात असे उदाहरणही त्याने दिले, यालाच प्रतिउत्तर म्हणून मी पंजाबी भाषा बोलतो कारण माझी आई शीख आहे असे बीग बींनी ट्विट केले. अमिताभ यांचे हे ट्विट पाहून लगेचच करणने त्यांची ट्विटरवरुन त्यांची माफी मागितली आहे.परंतु, अजूनदेखील अमिताभ बच्चन यांची नाराजी दूर झाली नसल्याचे दिसत आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews