दरवर्षी राजपथावर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलनात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने 'शिवराज्याभिषेक' दर्शविणारा चित्ररथ राजपथा वर प्रदर्शित होणार आहे. चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात येणार असून शिव राज्याभिषेक दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली जाणार आहे. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला विविध प्रतिमांच्या माध्यमा तून शिवराज्या भिषेकाचा अभूतपूर्व सोहळा दर्शविण्यात येणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणा-या गिताची धूनही राजपथावर सादर होणार आहे.महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews