रिलायन्सच्या 40th अॅनिवर्सरी सेलिब्रेशनमध्ये मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने एक स्पीच दिले. त्याचे हे स्पीच सोशल मीडियात चांगलेच वायरल होत आहे. कोणी त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्सचा मजाक उडवत आहे तर कोणी कौतुक करत आहे ट्विटरवर एका यूजरने कमेंट केले की, "जो कोणी अनंत अंबानीची मजाक उडवत आहे, त्याला कदाचित हे माहित नसेल की तो वयाच्या 7 व्या वर्षापासून सायनसच्या थर्ड स्टेज आजाराला तोंड देत आहे. मजाक उडवणा-यांनो, थोडे तर लाज थरा."अनंत क्रॉनिक अस्थमाचा पेशेंट आहे. त्याच्या स्थूल शरीराचे हेच मेन कारण आहे. अस्थमा असल्याने त्याच्या चालण्या, वागण्याला व फिरण्याला मर्यादा होत्या. वाढत्या वजनामुळे व अवाढव्य शरीरामुळे चेष्टेचा विषय बनलेल्या अनंतने 18 महिन्यात 108 किलो वजन कमी करून दाखवले होते. 2016 मध्ये त्याचा वेटलॉस हॉट टॉपिक्समध्ये गणला जात होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews