रिझर्व्ह बँक २०० रुपयांच्या नोटांच्या वितरणात वाढ करणार आहे. त्यासाठी सर्व एटीएममध्ये बदल करण्यात यावेत, असे आदेश बँकांना दिले आहेत. त्यामुळे काही दिवसांत सगळ्याच बँकांच्या एटीएममधून २०० च्या नोटा मिळतील.या आदेशाच्या अंमल बजावणी वर बँकींग क्षेत्राला १००० कोटी रुपये खर्च करावा लागू शकतो.२०० रुपयांच्या नोटांच्या वितरणासाठी बँका आणि एटीएमची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी लवकरात लवकर एटीएममध्ये बदल करावेत, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. ''२००० रुपयांच्या नोटांप्रमाणेच २०० रुपयांच्या नोटांचीही आवश्यकता आहे. रिझर्व्ह बँकेने चांगले पाऊल उचलले आहे.'' असे एका बँकेतील अधिकाऱ्याने सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाच्या काटेकोर अंमलबजावणीला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
देशात दोन लाखांहून अधिक एटीएम आहेत. २०० रुपयांच्या नोटांच्या वितरणासाठी या सर्व एटीएममध्ये बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी सहा महिने लागू शकतात, असे सांगण्यात येत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews