बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही माझी आई आहे, असा अजब दावा आंध्र प्रदेशातील 29 वर्षीय तरुणाने केला आहे. संगीत कुमार असे या तरुणाचे नाव आहे.ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी झाला. म्हणजेच 1988 मध्ये ऐश्वर्या अवघी 15 वर्षांची होती. लंडनमध्ये 1988 साली ऐश्वर्याने आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे मला जन्म दिला. वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत मी आजी वृंदा कृष्णराज राय यांच्यासोबत मुंबईत होतो. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून 27 व्या वर्षापर्यंत मी चोदावरममध्ये वाढलो.एप्रिल 2017 मध्ये माझे आजोबा कृष्णराज राय यांचं निधन झालं.माझ्या मामाचं नाव आदित्य राय आहे, असं त्याने सांगितलं. संगीतकडे आपल्या दाव्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
माझी आई ऐश्वर्या पती अभिषेक पासून विभक्त झाली असून एकटीच राहते. त्यामुळे आईने मंगळुरुत येऊन माझ्यासोबत राहावं. 27 वर्षांपासून मी तिच्या शिवाय राहत आहे. मला तिची खूप आठवण येते. किमान मला माझ्या आईचा फोन नंबर द्या' अशी मागणीही त्याने केली आहे.नातेवाईकांच्या दबावामुळे इतकी वर्ष आपण गप्प राहिलो, असा दावाही तरुणाने केला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews