२०१८ मध्ये प्रिमीयम टी.व्ही. सादर होणार आहेत. ज्यात ओएलईडी टी.व्ही. थिनक्यू आणि सुपर अल्ट्रा एचडी टी.व्ही. थिनक्यू यांचा समावेश आहे.यात युजर्सला अनेक सुविधा उपलब्ध होतील. यात आवाजावर टी.व्ही. चालेल. यात तुम्ही तुम्हाला जे पाहायचे आहे त्याचे संदेश बोलून टी.व्ही. ला देऊ शकता.शिवाय तुम्ही टी.व्ही. ला प्रश्नही विचारू शकता. म्हणजे जो चित्रपट मी बघत आहे त्याचे मुख्य कलाकार कोण कोण आहेत. याचे उत्तर तुम्हाला मिळेल. हा टी.व्ही. हाय डायनॅमिक रेंजवर चालेल. त्यामुळे डिस्प्ले गुणवत्ता उत्तम असेल. हा टी.व्ही. टीवी डॉल्बी एटमॉस प्रणाली वर काम करेल. त्यामुळे आवाजाची गुणवत्ता देखील चांगली असेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews