आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक जमाना आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं जागवणारा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या सध्या गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे. जयसूर्याच्या दुखापतीचं स्वरुप इतकं गंभीर आहे की, त्याला कुबड्यांचा आधार घेऊन चालावं लागत आहे.
श्रीलंकन जयसूर्या गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. आता तर त्याला कुबड्यांशिवाय चालताही येत नाही. सध्या त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियेची गरज असून, त्यासाठी तो मेलबर्नला जाणार आहे. ४८ वर्षीय जयसूर्या 2011 मध्ये निवृत्त झाला. तो श्रीलंकेच्या संघाचा आधारस्तंभ मानला जायचा. भलाभल्या गोलंदाजांना त्यानं आपल्या फलंदाजीनं नामोहरम केलं होतं.४८ वर्षांच्या जयसूर्यानं ४३३ वन डे आणि ११० कसोटी सामन्यांत श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या खात्यावर वन डेत १३,४३० तर कसोटीत ६९७३ धावा जमा आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews