रणबीर कपूर करीत असलेल्या संजय दत्तचा बायोपिक २९ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अजून ठरलेले नाही, पण तरीही चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका करणार असून नुकताच रणबीरने संजय दत्तप्रमाणे लूक केला होता. या लूकमध्ये रणबीर हुबेहुब संजय दत्तसारखा दिसत होता. रणबीर पहिल्यांदाच बायोपिकमध्ये काम करीत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews