लष्कर दिनासाठी दिल्लीच्या आर्मी परेड ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरावादरम्यान ध्रुव हेलिकॉप्टरची दोरी तुटून अपघात झाला. यात तीन जवान जखमी झाले. हेलिकॉप्टरच्या बुममध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.१५ जानेवारीला लष्कर दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दिल्लीच्या आर्मी परेड ग्राऊंडवर मंगळवारी सराव सुरू होता. त्यावेळी ध्रुव हेलिकॉप्टरमधून जवान दोरीच्या साह्याने उतरण्याचा सराव करत होते. मात्र, दोरी तुटली आणि जवान खाली पडले. यात तीन जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तिघांची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतरच अपघाताचं कारण समजेल, असंही अधिकारी म्हणाले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews