उमरेड पवनी अभयारण्याची शान असलेला जयचंद हा वाघ गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पडला होता.शिकार करण्याच्या निमित्तानं आलेला जयचंद पाण्यात पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जयचंदच्या सुटकेसाठी वन विभागाची टीम तातडीने तिथं पोहोचली.त्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल अडीच तासानंतर शिडीच्या माध्यमातून जयचंदला कालव्यातून बाहेर काढण्यात यश आलं. जयचंदला पाहण्यासाठी गावक-यांची मोठी गर्दी जमल्यानं घटनास्थळी पोलिसांचा ताफाही होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews