नाशिक - संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळाचे शुक्रवारी (12 जानेवारी) पहाटे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यात्रेसाठी राज्यातून 600 दिंड्या दाखल झाल्या आहेत. वारक-यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडूनही योग्य ती काळजी घेण्यात आली आहे.