रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पासून या चारही टाकसाळींना नाणी पाडण्याचं काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीनंतरचा हा आणखी एक दणका असल्याचे मानले जात आहे.
नाणेबंदीसंदर्भात असंही एक कारण दिलं जात आहे, ते म्हणजे नोटाबंदीनंतर देशभरातील विविध टाकसाळीत मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्यात आली होती. पण ही नाणी अजूनही मोठ्या प्रमाणात रिझर्व बँकेत स्टोअर करुन ठेवण्यात आली आहेत.रिझर्व बँकेच्या एका नोटीसमधूनही याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. 8 जानेवारीच्या या नोटिसीमध्ये म्हटलंय की, चलनविषयक धोरण समिती कडे 2500 लाखापेक्षा जास्त नाणी स्टोअर आहेत. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत टाकसाळीत नाणी पाडण्याचं काम थांबवण्यात यावं,” असं सांगण्यात आलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews