पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी भारतावर अणुहल्ला करण्याची धमकी दिली आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या वक्तव्यानंतर ख्वाजा यांनी ही अणुहल्ल्याची भाषा केली आहे.
भारतीय लष्करप्रमुखांकडून करण्यात आलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. सध्या आम्ही कोणताही मुद्दा सौम्य घेत नाही. कोणत्याही चुकीच्या आधारावर कोणतीही अडचण व्हायला नको.
तसेच पाकिस्तान स्वत:चे रक्षण करण्यासाठी व स्वत:ला वाचवण्यासाठी सक्षम आहे, असे असिफ म्हणाले आहेत.
पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ब्ल्फ आणि सीमा रेषा पार करण्यासाठी आम्ही तयार आहोत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews