राज्य सरकारनं आज अनाथ मुलांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गात 1 टक्का आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनाथाश्रम सोडल्यानंतर शिक्षण आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या समस्त अनाथ मुलांना त्याचा थेट फायदा होणार आहे.या निर्णयानुसार आता शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत आता अनाथ असाही रकाना असणार आहे. ज्यामुळे शासकीय नोकरीत 1 टक्के आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews