रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पारंपारिक पद्धतीने ख्रिश्चन लोकांचा सण 'एपिफनी' साजरा केला.या सणाच्या दिवशी रितीरिवाजानुसार पुतिन यांनी अतिशय थंडीमध्ये देखील बर्फाच्या पाण्यात अंघोळ केली. 'एपिफनी' हा 'प्रभुप्रकाश' म्हणून साजरा केला जाणार सण आहे. जवळपास २०० वर्षापासून हा सण साजरा केला जातोय.रशियामध्ये १८ मार्चला राष्ट्राध्यक्षपदा ची निवडणूक होणार आहे. पुतिन पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. पुतिन हे कम्युनिस्ट शासनात मोठे झाले आहे. राष्ट्राध्यक्षाच्या रुपात ते रशियाच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews