''सॅनिटरी पॅडवर आतापर्यंत एकही व्यावसायिक सिनेमा बनवण्यात आला नाही. कारण, लोक अशा विषयावर जाहीरपणे बोलत ही नाहीत,' '.'पॅडमॅन'च्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमार बोलत होता. ''नेहमीच सामाजिक विषयांवर सिनेमा करण्याची इच्छा होती. मात्र तेव्हा मी निर्माता नव्हतो आणि आवश्यक तेवढा पैसाही नव्हता. मात्र आता हे काम करु शकतो.''सॅनिटरी पॅड किंवा मासिक पाळीवर हॉलिवूड मध्येही आतापर्यंत सिनेमा झालेला नाही. लोक नेहमी याविषयी सांगतात, मात्र कुणीही व्यावसायिक सिनेमा बनवत नाहीत, कारण सर्व जण यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आम्ही या दिशेने एक नवं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे,'' असं अक्षय कुमार म्हणाला.९ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा देशभरात रिलीज होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews