काही दिवसांपूर्वी फिरण्या साठी बाहेर गेलेल्या एका व्यक्तीला अचानक लघुशंका आली. आजू बाजूला सार्वजनिक शौचालय न दिसल्याने त्याने एका हॉटेलचे शौचालयाचा वापरले. काही वेळाने तो बाहेर आल्यानंतर त्याला हॉटेलच्या मॅनेजरने त्याला ११ रुपयांचे बील दिले. विशेष म्हणजे या बीलावर ५% जीएसटी करही आकारण्यात आला होता. सध्या शौचालय वापरण्या साठी आकारण्यात आलेल्या या बिलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.बाहेर फिरायला गेल्यानंतर अचानक लघुशंका किंवा शौचास आली आणि जवळपास एकही सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्यास हॉटेलमध्ये शौचालय वापरले जाते. त्यामुळे अनेक राज्य सरकारने एक नियम बनवत सार्वजनिक ठिकाणी महिला आणि लहान मुलांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये शौचालयाचा वापर करण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी पैसे देण्यात यावे असेही म्हटले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews