सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्नच निर्माण झाला नसता आणि संपूर्ण काश्मीर आज भारता चाच भाग असता, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. फाळणी हे काँग्रेसचेच पाप असून विभाजन हे काँग्रेसच्या रक्तातच असल्याची टीका त्यांनी केली.अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत मांडला. मोदींचे भाषण सुरु होताच तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद नसल्याने तेलगू देसमचे खासदार आक्रमक झाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews