भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांमधील सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 ने आघाडी घेतली आहे. तिस-या सामन्यात भारताने 124 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. भारताचा एकदिवसीय मालिकेतील हा सलग तिसरा विजय होता. भारतीय संघाचे फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने 4-4 विकेट्स घेत नवा रेकॉर्ड केला. मात्र या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. एकदिवसीय सामन्यात स्टमपच्या मागे 400 विकेट्स घेणारा महेंद्रसिंग धोनी पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम हा धोनीचा 400 वा खेळाडू ठरला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews