काल पहाटे पाच वाजता दहशतवाद्यांनी सुंजवाँच्या आर्मी कॅम्पवर हल्ला केला होता.जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी पहाटेच्या सुमारास ज्युनियर ऑफिसर्स राहत असलेल्या परिसरात घुसले आणि त्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यामुळे लष्करी जवानांच्या कुटुंबांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं.सुंजावाँ ब्रिगेड परिसर या लष्करी तळामध्ये तब्बल ३ हजार जवान आहेत.रउफ असगर या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. मौलाना जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा तो भाऊ आहे. अफजल गुरुला फाशी दिल्याच्या घटनेला 9 फेब्रुवारीला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे असा हल्ला होऊ शकतो याची सूचना गुप्तचर यंत्रणेनं दिली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews