Lokmat News | तर अशा पद्धतीने सुरू केले जातात पॉश Restaurant आणि Bar | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 1

बांद्रा रिक्लेमेशनच्या ओएनजीसी कॉलनीतील एका रस्त्यावर ओळीने २० हून अधिक रेस्टॉरंट, बार आहेत. अधिकृत गाळे ३५० चौरस फुटांचे असले तरी समोरच्या मोकळ्या जागेचा व्यवसाया साठी वापर केला जातो.कमला मिल दुर्घटने नंतर साऱ्या मुंबईभर कारवाईचं रान उठलं. मात्र, इथल्या एकाही रेस्टॉरंट किंवा बारच्या अनधिकृत बांधकामाची एक वीटही हलली नाही. कारण इथं सगळेच एकमेकांना सामील आहेत.आजूबाजूला निवासी इमारती असल्या तरी इथं रात्री २ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात धिंगाणा सुरू असतो. ज्याचा त्रास स्थानिकांनाही होतो. पोलीस ही कारवाईबाबत हात वर करत असल्याचा अनुभव स्थानिकांनी व्यक्त केलाय.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS