रोहित शर्माने आजचा दिवस विशेषरित्या साजरा करत आहे. शतकी खेळी आणि व्हॅलेंटाईन डे अशा दुहेरी आनंदात तो रंगून जाताना दिसत आहे. या आनंदात त्याने आपली पत्नी रितिकाला खास भेट दिली आहे.आपल्या विजयाचे संपूर्ण श्रेय या 'हिटमॅन'ने पुन्हा एकदा आपल्या पत्नीच्या नावावर केले आहे. रोहितने पाचव्या एकदिवसीय सामन्यात १२६ चेंडूमध्ये शानदार ११५ धावा ठोकून शतकी खेळी केली. भारताच्या विजयात त्याचा सिंहाचा वाटा ठरल्यामुळे त्याला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले. सामनावीराचे हे गिफ्ट रोहितने जसेच्या तसे पत्नी रितिकाला दिले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews