पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि ‘तेहरीक-ए- इन्साफ’ पक्षाचा प्रमुख इमरान खान तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे. आध्यात्मिक गुरू असलेल्या बुशरा मनेका हिच्याशी त्याने लग्न केले. हा विवाह इमरानसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठीच लकी ठरणार असल्याचे ‘तेहरीक-ए- इन्साफ’ पक्षाचे नेते इनामुल हक यांनी सांगितले. हा विवाहसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.इमरान खान यांना विवाह सोहळा हाय प्रोफाईल बनवायचा नव्हता.इमरानची पहिली पत्नी पाकिस्तानी आणि ब्रिटिश पत्रकार जेमिमा गोल्डस्मिथ होती. तिच्यापासून दोन मुले आहेत.त्यांचा हा संसार ९ वर्ष चालला. त्यानंतर इमरानने जानेवारी २०१६ मध्ये रेहम खान हिच्याशी लग्न केले. त्यांचा हा विवाह १० महिनेच टिकला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews