आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादवचा मोठा मुलगा आणि बिहारचा माजी मंत्री तेजप्रताप यादवने भूतांच्या भीतीने सरकारी बंगला सोडल्याची माहिती आहे. बरं इतकंच नाहीतर यावर तो म्हणाला की, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सुशील मोदी यांनी त्याच्या सरकारी बंगल्यात भूत सोडले आहेत. त्यामुळेच बंगला रिकामा केलाय. तेजप्रताप यादव बोलले की, ‘त्यांच्याकडे आधीपासूनच बंगला आहे आणि मला कोणत्याही सरकारी भीकेची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देत म्हटले की, आम्हाला नरपिशाचांवर भूत-पिशाच सोडण्याची काय गरज. मोठ्या मुश्किलीने इतक्या मोठ्या भूतापासून पिच्छा सुटला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews