Lokmat News | आम्ही चिल्लर स्वरूपात फी घेऊ शकत नाही | मुलीचे वर्ष वाया | Education Year Waste | News

Lokmat 2021-09-13

Views 0

गंजबासौदा येथे राहणाऱ्या ठाकूर सिंग रघुवंशी यांची मुलगी तेजस्वी रघुवंशी ही विद्यार्थीनी सेंट जोसफ शाळेत २ इयत्तेत शिकत आहे. फी भरल्याशिवाय मुलीला परिक्षेला बसू दिले जाणार नाही असे स्पष्टपणे शाळेच्या प्रबंधकांनी विद्यार्थींनीच्या वडीलांना सांगितले. तेजस्वीनीच्या मजूर वडीलांनी पिगी बॅंकेत साठवलेली चिल्लर जमा केली आणि मुलीचे १९७० रुपये फीज भरण्यासाठी शाळेत पोहचले. मात्र शाळेने चिल्लर घेण्यास नकार दिला आणि फी शाळेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. यानंतर तेजस्वीनीचे वडील बॅंकेत पोहचले. तर तिकडेही बॅंकेच्या अधिकाऱ्याने चिल्लर मोजले पण जमा करण्यास नकार दिला. खूप प्रयत्न करूनही बॅंकेत पैसे जमा करण्यास विद्यार्थींनी च्या वडीलांना यश आले नाही. त्यामुळे शाळेची फी भरली गेली नाही आणि त्या विद्यार्थींनीला परीक्षेला बसता आले नाही. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS