ईडीने मनीलाँड्रिंग विरोधी कायदा अंतर्गत नीरव मोदी समूहाच्या २१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. यात फ्लॅट आणि फार्महाऊसचा समावेश आहे. या जप्त केलेल्या संपत्तीची किंमत ५२३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येतेय. एका खबऱ्याने दिलेल्या माहिती च्या आधारे शुक्रवारी एका गोदामावर देखील धाड घालण्यात आली होती. यात महागडी घड्याळं ईडीच्या हाती लागली होती. सुमारे १० हजारांच्या आसपास घड्याळं या गोदामात होती. ती १७६ स्टीलची कपाटं, १५८ डबे आणि ६० प्लास्टिकच्या बॉक्समध्ये भरून ठेवली होती.नीरव मोदीच्या बँक खात्यांमधून ३० कोटी रुपये सील करण्यात आले आहेत. यासोबतच १३.८६ कोटी रुपयांचे शेअर्सची सील गोठवण्यात आले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews